कोरोना : राज्याला मोठा दिलासा, आज तब्बल ६१ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. प्रचंड रुग्णवाढीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून चिंतेत असलेल्या राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास सव्वा महिन्यानंतर ४० हजारांच्या खाली आली आहे. आज राज्यामध्ये कोरोनाच्या ३७ हजार २३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात तब्बल ६१ हजार ६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दैनंदिन मृत्यूंचा आकडाही मोठ्या प्रमाणात खाली आला आहे.

आरोग्यं मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३७ हजार २३६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात जवळपास ६१ हजार ६०७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून सहा लाखांच्या आत आली आहे. आता राज्यामध्ये ५ लाख ९० हजार ८१८ एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ५१ लाख ३८ हजार ९७३ एवढी झाली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ६९ हजार ४२५ एवढी झाली आहे. आज झालेल्या ५४९ मृत्यूंमुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा हा ७६ हजार ३९८ वर पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button