कोरोना गॉन…कॅमेरा ऑन

Nivedita Saraf-Corona Gone-Camera on

रोज सकाळी जशी शिफ्ट असेल त्याप्रमाणे सेटवर पोहोचायचे. मेकअपसह तयार होऊन सीन द्यायचा. दिवसभरात ठरलेले एपिसोड शूट करत असताना रिकाम्यावेळेत मजा धमाल करायची आणि पॅकअप झाले की घरी जायचे. मालिकेतील कलाकार म्हणून हाच दिनक्रम होता. पण कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे रूटीन बदलून गेले. मग काय, क्वारंटाइन सुरू झालं. औषधं, आहार, विश्रांती आणि सहकलाकारांसोबत ऑनलाइन गप्पा. अग्गंबाई सासूबाई मालिकेतील निवेदिता सराफ यांची गेल्या १४ दिवसांची ही स्टोरी आता संपली आणि त्या बबड्याला हाक मारत कुलकर्ण्यांच्या ऑनस्क्रीन घरात दाखल झाल्या. कोरोना गेला आणि आता कॅमेरा आला. कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतरच मी सेटवर आले आणि खऱ्याअर्थाने पॉझिटिव्ह झाले असं म्हणत निवेदिता (Nivedita) यांनी सेटवर पाऊल ठेवलं.

Watch: Nivedita Saraf and Girish Oak give fans a sneak peek into the set of  Aggabai Sasubai - Times of Indiaअग्गंबाई (Aagbai sasubai)मालिकेत आसावरी नाही म्हणजे स्टोरी पुढे जाण्याची किल्लीच नाही इतकी आसावरीची भूमिका महत्वाची आहे. आता इतरवेळी मालिकेतील कलाकाराला खऱ्या आयुष्यात कुठे पर्यटनाला जायचे असेल, त्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा मालिकेतही तो परदेशी किंवा कामानिमित्ताने बाहेर गेल्याचे दाखवले जाते. अर्थात आजकाल कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर अपडेट असल्याने इकडे मालिकेत ते दिसत नसल्याचे कारण सूज्ञ प्रेक्षकांना कळतेच. जेव्हा निवेदितांना कोरोना झाल्याचे कळले तेव्हा आता मालिकेतील ट्रॅक त्यांच्याभोवतीच फिरत होत. पण कोरोनामुळे त्यांना सक्तीची विश्रांती आली. बाबांना भेटायला आसावरी गावी गेल्याचे दाखवतील अशी अटकळ बांधलेल्या प्रेक्षकांना चॅनेलने वेगळाच धक्का दिला. असं म्हणतात की मालिका या प्रेक्षकांच्या वास्तव जीवनातील घटनांचे प्रतिबिंब असते. म्हणूनच आठवडाभर सप्ताह स्पेशलचा प्रयोग करत अभिजित, सोहम आणि शुभ्रा यांनी किल्ला लढवताना निवेदिताशी गप्पा मारतच एपिसोड केले. आठवडाभर स्क्रीनवर आशुतोष, तेजश्री आणि डॉ. गिरीश ओक (Girish Oak) होते. मालिकेच्यासेटवरील या परिस्थितीला चॅनेलने कोणताही खोटा रंग दिला नाही तर मालिकेच्या निमित्ताने कोरोनाची जागृतीही केली.

जिथे कामाच्या निमित्ताने माणसं एकत्र येतात तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी जे निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक होता मालिकांच्या चित्रिकरणांचे पॅकअप. मार्चपासून मालिकांची चित्रीकरणे थांबवण्यात आली होती. आता डेली सोप म्हणजे रोजचं शूटिंग आलं. एपिसोड बँक करायची म्हणजे महिन्यातील २६ दिवस १८ तास काम. पण हे सगळं थांबलं होतं. साडेतीन महिन्यांनंतर जुलैच्या मध्यावर मालिकांच्या सेटवर पुन्हा गजबज झाली कारण चित्रीकरण सुरू झाले. मालिकांचे नवे एपिसोड ऑनएअर यायला लागले. अर्थात सगळी काळजी घेण्याचे नियम पाळले जात होते. अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या सेटवरही सगळी दक्षता घेतली जायची. पण तरीही १५ सप्टेंबरला या मालिकेची मुख्य नायिका आसावरी अर्थात निवेदिता सराफ यांना सर्दी झाली म्हणून त्यांनी कोविड टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली.

आता पुढे काय हा प्रश्न होताच. बबड्याने आजपर्यंत कोणते चांगले काम केले यावर गप्पा रंगल्या. आसावरीच्या रूपाने निवेदिताही सेटवर नसल्याने तिच्या उत्कृष्ट सीनवर सगळे भरभरून बोलले. तिकडे निवेदिता सात दिवसांच्या उपचाराचा कोर्स पूर्ण करत होत्या तर इकडे राजे आणि कुलकर्णी त्रिकूट मिळून बिहाइंड द सीनमधून मनोरंजन करत होते.

क्वारंटाइन काळ संपवून कोरोनामुक्त होऊन निवेदिता यांचे सेटवर आगमन झाले आणि त्यांच्या स्वागतासाठी अख्खी टीम सज्ज झाली. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने निवेदिता सात दिवसातच कोरोनामुक्त झाल्या. आता वेळ होती पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभे राहण्याची. निवेदिता सांगतात, आमच्या मालिकेच्या सेटवर सगळ्यांना नियम पाळण्यासाठी तगादा लावणारी मीच होते. शिवाय सगळ्या टीमला मी काढा करून द्यायचे. दिवसातून तीन वेळा आमच्या मालिकेच्या सेटवर काढा बनायचा. तरीही कोरोनाने मला गाठलंच. पण आता पुन्हा मालिकेच्या शूटिंगमध्ये रमल्याने माझा कंटाळा कुठच्याकुठे पळून गेला आहे.

अरे बबड्या, उठ ना रे राजा अशी लाडीक हाक आता घराघरात घुमेल. अगं प्रज्ञा तू , येना, सुलभा काकू, बसा हं, अहो, अभिज किचनला निघताय का जायला…जरा खाऊन जा हा संवाद आता पुन्हा निवेदिता यांच्या परतण्याने प्रेक्षकांच्या कानावर पडेल. कोरोनाला मागे सारत पुन्हा कॅमेऱ्यासमोर आलेल्या निवेदिता यांचे जंगी स्वागत करत त्यांच्या सहकलाकारांमध्येही उत्साह संचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER