संसर्ग रोखण्यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा; हसन मुश्रीफ यांची घोषणा

Hasan Mushrif - Corona Free Village

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर ताण वाढला होता. मात्र, आता स्थिती नियंत्रणात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी १ जूनपासून काही निर्बंधात शिथिलता करण्याची घोषणा केली. ज्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत, त्या ठिकाणी निर्बंध कडक करण्याचे आदेश दिले आहेत. आता ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी घोषणा केली आहे.

गावांना बक्षीस
‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. सहा महसुली विभागात प्रत्येकी तीनप्रमाणे एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. या बक्षिसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव कोरोनामुक्त करावे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button