कोरोना : महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी आढळले १४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या (Corona) रुग्णवाढीचा वेग कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. आज दिवसभरात ११ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

मागील काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत रोज १४ ते १५ हजारांची भर पडते आहे. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४७ हजार ९९५ झाली आहे. आज दिवसभरात १४ हजार ३६१ रुग्ण आढळलेत. आज ११ हजार ६०७ करोना रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण १ लाख ८० हजार ७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.६२ टक्के झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आढळले. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ संशयित रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. ३४ हजार ९०८ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील रुग्णांचा मृत्यूदर ३.१८ टक्के आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ४७ हजार ९९५ झाली आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER