कोरोना : गणेश मंडळांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत

Corona Virus

मुंबई : मुंबईत हजारोच्या संख्येने गणेश मंडळं आहेत. गणेशोत्सवासोबतच ही मंडळं विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. देशावरील, राज्यावरील संकटांमध्येही गणेश मंडळं मदतीला धावून येतात. आताही कोरोना सारख्या जागतिक संकटकाळीही गणेश मंडळांनी मदतीचा हात पूढे केला आहे.

गणेशोत्सव मंडळे आणि त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला केलेली मदत :

1. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (मुंबईचा राजा) – 5 लाख रुपये

2. आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (अंधेरीचा राजा) – 5,01,111 रुपये

3. शिवडी मध्य विभाग गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा) – 51 हजार रुपये

4. बाल मित्र मंडळ, ग्रँट रोड – 50 हजार रुपये

5. वरळीचा महाराजा – 51 हजार रुपये

6. उमरखाडी सार्वजनिक नवरात्री आणि गणेशोत्सव मंडळ – 1 लाख रुपये

7. आय सी कॉलनी गणेशोत्सव मंडळ, बोरिवली – 25 हजार रुपये

राज्य सरकार आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, विभागात निर्जंतुकीकरण यासारखे उपक्रम देखील गणेश मंडळे राबवित आहेत.