कोरोनाची लक्षणं जाणवतात, ईडीसमोर उद्या हजर होणार नाही – एकनाथ खडसे

Eknath khadse

मुंबई :- पुण्यातील भोसरीतील येथील जमीन खरेदी प्रकरणात चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर व्हा, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना बजावण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची लक्षणं जाणवतात म्हणून ईडीसमोर उद्या हजर होणार नाही असे खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे मुंबईत आले आहेत मात्र उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहाणार नसल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आल्याची माहिती त्याच्या वकिलामार्फत कोर्टाला देण्यात आली.

एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, एक महिन्यापूर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER