येत्या १५ ते २० दिवसांत कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता!

Coronavirus

नवी दिल्ली :- भारतात कोरोना संक्रमणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येने ८० हजारांचा  आकडा गाठला आहे. तर रोज होणाऱ्या मृत्युदराचा आकडा हा आता ५०० वर पोहचला आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णांमुळे देशात कोरोना विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील १५ ते २० दिवसांत रोज ८० ते ९० हजारांनी रुग्णसंख्या वाढणार असल्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर, ही रुग्णसंख्या १ ते १.५ लाखांवर पोहचू शकते. तर काही दिवसांनंतर यात घट होऊन रुग्णसंख्या कमी होणार आहे, अशी माहिती आयआयटी कानपूरचे तज्ज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक आहे. एका दिवसात ४३ हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे.

यातच मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच बैठकासुद्धा घेतल्या. सर्वत्र लसीकरण मोहिमेची संख्या वाढवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजार पार गेला आहे. गुरुवारी ४३ हजार १८३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button