आज राज्यात कोरोनाचा विस्फोट, तब्बल ११ हजार १४१ नव्या रुग्णांची नोंद

Corona Virus - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज तर राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, नव्या कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. आज राज्यात तब्बल ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले असुन, ३८ रूग्णांच्या मृत्युंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ४७८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ९७,९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या सर्वसामान्यांसह राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

दरम्यान, आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २०,६८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER