योग्य वेळेत आयसीयू बेड न मिळाल्याने वडील गमावलेल्या रश्मीचा अनुभव अनेकांना भानावर आणणारा

Rashmi pawar

हॉस्प्टिटल व प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा कळस. किमान आतातरी प्रशासनाला जाग यावी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे रश्मिची सरकारला विनंती.


नाशिक : गेला एक महिना रश्मी पवारचे वडील कोरोनाशी लढत होते. मात्र, अख्या नाशकात सुसज्ज हॉस्पिटलचा एक आयसीयू बेड मिळू शकला नाही. एका आयसीयू बेडसाठी रश्मीच्या परिवाराने मोठा संघर्ष केला. मात्र, नाशकातील अनेक मोठ्या हॉस्पिटल्सकडून त्यांना खोट्या आशेवर ठेवून शेवटच्या क्षणी आमच्याकडे बेड नसल्याचेच उत्तर दिले. अनेक प्रयत्नांनतर एका हॉस्पिटलमध्ये बेड मिळवला. तेथे 25 दिवस तिचे वडील कोरोनाशी झूंज देत होते. मात्र, अखेर त्यांची कोरोनाशी लढाई अपयशी ठरली.

एक आयसीयू बेड मिळवण्यासाठी काय काय संघर्ष केला. कोरोनाला आपण गांभीर्याने न घेण्याचे परिणाम आपल्याला मृत्युच्या दारात नेऊ शकतात याचे गांभीर्य सांगणारा. अधिकारी, राजकारणी यांना पैशाच्या जोरावर कोविडचे फार लक्षणं नसतानाही कसे ते बेड अडवून ठेवतात. सामान्य माणसांना मात्र, एका आयसीयू बेडसाठी किती संघर्ष करावा लागतो असा सर्व अनुभव रश्मीने एका व्हीडिओच्या माध्यमातून सांगितला आहे.

तसेच, महाराष्ट्र सरकार व मंत्र्यांनाही रश्मीने खडे बोल सुनावले आहेत.कोरोनाने वडील गमावलेल्या रश्मीने पाणी भरल्या डोळ्यांनी आपला अनुभव सांगताना प्रशासन व मंत्र्यांना मिळणारी फाईव्ह स्टार सोय याविषयीची चिडदेखील रश्मीने व्हीडिओतून व्यक्त केली आहे.

यावेळी रश्मी हीने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे उदाहरण देऊन मंत्र्यांना कशी एका दिवसात फाईव्ह स्टार सोय प्रशासन उपलब्ध करून देऊ शकते मात्र, सामान्यांना ती मिलवण्याठी मोठा संघर्ष करावा लागतो व अखेर प्रांणाशी मुकावं लागतं अशी चीड व्यक्त करत मंत्र्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामकाजावर प्रश्नही उपस्थित केले आहेत.

मंत्र्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कउपचारासाठी का यावे लागते. त्यांच्य़ा मतदारसंघात उपचाराच्या उत्तम सोयी त्यांनी उपलब्ध का नाही केल्यात. की, त्यांच्याच क्षेत्रातील प्रशासमनावर त्यांचा विश्वास नाही का असे प्रश्न रश्मीने उपस्थित केले आहेत.

कोरोनाची भीती बाळगू नका पण कोरोनाला हलक्यावर पण घेऊ नका असे आवाहन रश्मीने केले आहे.

जोपर्यंत कोरोना आपल्या घरात येत नाही,तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही… तो घरात येण्याची वाट बघू नका, वेळीच सावध व्हा असे आवाहन रश्मीने केले आहे. त्याचप्रमाणे किमान आतातरी प्रशासनाला जाग यावी आणि जनतेच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावे अशी अपेक्षा रश्मीने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER