कोरोना इफेक्ट : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

Boris Johnson

नवी दिल्ली : ब्रिटन (Britain) मधील कोरोनाच्या (Corona) नव्या स्ट्रेनचा वाढता प्रभाव आणि यातून लागू केलेला लॉकडाऊन यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. यंदाच्या २६ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

जगभरात कोरोनाचा प्रभाव तसा कमी झाला असला तरी ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने जगभरात एकच खळबळ उडाली होती. नवा स्ट्रेन तब्बल ७० पट वेगाने पसरत असल्याने जगभरात ब्रिटनमधून येणाऱ्या विमान सेवेवर निर्बंध घालण्यात आले होते. नव्या स्ट्रेनच्या वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ब्रिटनने संपूर्ण लॉकडाऊन नुकताच घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER