कोरोना इफेक्ट : मुंबईत 50 टक्के लग्नात कपात

Coronavirus - Marriage

मुंबई : कोरोनामुळे (Corona) विशेष विवाह कायद्यांतर्गत झालेले विवाह यंदा तब्बल 50 टक्क्यांपर्यंत घटले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत विशेष विवाह कायदा व विवाह नोंदणी कायद्याच्या कलम 16 अंतर्गत 1163 जोडपी विवाह बंधनात अडकली होती. मात्र यंदा नोव्हेंबरपर्यंत हाच आकडा 682 पर्यंत खाली आला आहे. याशिवाय एकट्या मुंबई शहरात हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या विवाहांमध्ये 50 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत शहरात या कायद्यांतर्गत 27365 विवाहांची नोंदणी झाली होती. यंदा मात्र नोव्हेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या विवाहांचा आकडा 12098 वर आला आहे.

विवाह निबंधकांच्या मते, यंदा लॉकडाऊनमुळे हजारो जोडप्यांनी आपले विवाह पुढे ढकलले तर काहींनी बेरोजगार झाल्याने किंवा व्यवसायातील नुकसानीमुळे आपले विवाहच रद्द केले. हिंदू कॅलेंडरनुसार विवाहाचा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे हा हंगाम ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडला. यामुळे अनेकांचे प्रवासाचे नियोजन रद्द झाले. परिणामी, ज्यांना विवाहविषयक बोलणी, चर्चा करायच्या होत्या ते सर्वजण नाराज झाले. हिंदू विवाह कायद्यांतर्गत आकडेवारीनुसार, मुंबईत एप्रिलमध्ये 4 विवाहांची नोंदणी झाली. याशिवाय मे महिन्यात 107 तर जूनमध्ये 66 विवाहांच्या नोंदी झाल्या आहेत. वास्तविक या तीन महिन्यांमध्ये दरवर्षी हजारो विवाह समारंभ होत असतात. अनेक लोक कोरोना महामारीमुळे भयभीत झाले होते. परिणामी त्यांनी विवाहच केले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER