लॉकडाऊनच्या नियमामुळे कोरोना आटोक्यात; नवाब मलिकांचे मत

Nawab Malik

मुंबई :- देशात आणि महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत आहे. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केल्यानेच कोरोना नियंत्रणात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यातील दहा जिल्ह्यांत अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. तर, काही जिल्हयात कडक निर्बंध लागू आहेत. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केल्यास आपण कोरोनातून मुक्त होऊ. नियमांचे पालन ना केल्यास दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button