राज्यभरात परिचारिकांचे आंदोलन सुरु ; 8 तारखेपासून कामबंद पुकारणार

nurses protest

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान (Corona Crises) घातले आहे . या संकट काळात राज्यभरातील परिचारिकांनी (Nurses) 1 सप्टेंबर पासून काळ्या फिती लावून आंदोलन (protest) करण्यास सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 8 तारखेपासून एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार या दिवशी जी रुग्णालयामध्ये समस्या निर्माण होईल याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या (Maharashtra State Nurses Association) उपाध्यक्षा हेमलता गाजबे यांनी म्हटले आहे .

राज्यात परिचारिकांची तब्बल 70 ते 80 हजार संख्या आहेत. या सर्वांनी 1 तारखेपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

शासन परिचारिकांच्या सहनशीलतेचा गांभीर्याने विचार करत नसल्याचे आरोप करीत परिचारीकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना अतिसंवेदनशील व न्यायिक मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे या संघटनेच्या अध्यक्षा हेमलता गजबे यांनी लोकमतला सांगितले. रुग्णसेवा विस्कळीत न करता काळ्या फिती लावून परिचारिका निदर्शने करणार आहोत. याची दखल न घेतल्यास 8 सप्टेंबरला एक दिवस काम बंद आंदोलन छेडणार आहे. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास आम्हास बेमुदत संपावर जावे लागणार असल्याचे गजबे यांनी सांगितले.

परिचारीकांच्या या आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी छेडण्यात येणाऱ्या या आंदोलनाद्वारे आर्थिक अपव्यय टाळण्यासाठी व चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवा देण्यासाठी रिक्त पदी नियमित पदभरती करणे, कोविड कक्षात रोटेशन करताना अत्यंत अपुरे मनुष्यबळ असल्याने व रुग्ण संख्या क्षमतेपेक्षा खूप जास्त असल्यामुळे परिचारिकावर प्रचंड मानसिक ताण येतो, तो टाळण्यासाठी सात दिवस रोटेशन व सात दिवस क्वारंटाईन हा क्रम कायम ठेवावा. त्यांना प्रोटीनयुक्त आहार व चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.

दरम्यान परिचारिकांनी ऐन कोरोनाच्या महामारीत आंदोलन पुकारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER