‘कोरोनातून महाराष्ट्र मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करा, याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा’ : धंनजय मुंडे

Dhanajay Munde

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाने(Corona) थैमान घातले आहे . कोरोनापासून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी येत्या १५ जुलै रोजी असलेला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, या दिवशी कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन आपल्या समर्थक/चाहत्यांना केले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांची सुरक्षा आपल्यासाठी जास्त महत्वाची असल्याचे धनंजय मुंडे मुंडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER