
मुंबई :- देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगड व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. अस असलं तरी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळायला हवी. आम्ही सरकारला सूचना करू शकतो. त्या स्वीकारायच्या की नाही हे सरकारवर अवलंबून आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
देशातील परिस्थिती आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येविषयीही त्यांनी भाष्य केलं. विशेषतः मुंबईत कोरोनाच्या प्रसाराच्या कारणांचा उलगडा करतानाच त्यांनी राज्यातील सत्तेत असलो तरी निर्णय घेऊ शकत नाही. मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करायला हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटलं होतं की, २१ दिवसांत आपण कोरोना व्हायरसचा पराभव करू. पण, आता ६० दिवस झाले आहेत आणि कोरोना व्हायरस देशात झपाट्यानं पसरत चालला आहे. अशा स्थितीत आता लॉकडाऊन हटवण्यात येत आहे. लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण होत आहेत; पण, पंतप्रधानांना जे अपेक्षित होतं, ते परिणाम मिळालेले नाहीत. त्यामुळे आता पुढे सरकार काय करणार आहे. कारण लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
Watch my LIVE video press conference on the Covid crisis, the Lockdown & other related issues. https://t.co/6O83YiAPXX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला