कोरोना नियंत्रणाबाबत अपेक्षित यश मिळालेले नाही; मुख्यमंत्र्यांचे लॉकडाउनबद्दल सूचक विधान

Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचा उच्चांक गाठत असल्याने देशभरात भीतीचे वातावरण होते. मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात वेळोवेळी सांगितले आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला. नागरिकांनी मनापासून सहकार्य केले त्यामुळे हे थोडे काही नियंत्रण आले आहे, मात्र अजून अपेक्षित यश मिळालेले नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने राज्यांनी निर्बंधाची साखळी आवळण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातही १४ एप्रिलपासून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली. राज्यात आता १ जूनपर्यंत लॉकडाउन आहे. मात्र, त्यानंतर काय, असा प्रश्न आहे. लॉकडाउन वाढवण्याकडेच इतर राज्यांचा कल दिसून येत असून, आज झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंदर्भात उल्लेखित सूचक विधान केले आहे.

काही राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या संसर्गाची लाट कमी होताना दिसत असली तरी धोका कायम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. त्यातच कोरोनाचे नवीन म्युटेंट लहान मुलांसाठी घातक असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लहान मुले आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक विभाग निर्माण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button