कोरोना : काँग्रेसचे नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये

Ahmed Patel

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांची प्रकृती खालावली आहे. कोव्हिड (COVID-19) संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमद पटेल यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Congress leader Ahmed Patel in ICU weeks after being infected with coronavirus) अहमद पटेल ऑक्टोबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

ही माहिती त्यांनी १ ऑक्टोबरला ट्विटरवरून दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती केल्याची माहिती कुटुंबीयांनी रविवारी दिली.

“अहमद पटेल यांच्या कुटुंबीयांच्यावतीने सांगू इच्छितो, की आमचे वडील काही आठवड्यांपूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.” असे अहमद यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विटरवरून सांगितले. “अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा.” अशी विनंतीही फैजल यांनी केली. पटेल हे गांधी परिवाराच्या अतिशय निकटचे नेते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER