कोरोना : काळजी वाढली, आज आढळलेत नवे १५,६०२ रुग्ण; ८८ मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यातील कोरोना (Corona) संसर्गाचे प्रमाण रोज वाढते आहे. आज नवे १५,६०२ रुग्ण आढळलेत. ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर २.३ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढतो आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडते आहे. खबरदारी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. काही शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

आज ७ हजार ४६७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४९ टक्के आहे.

गेल्या काही दिवसांत देशभरात नव्याने सापडलेल्या रुग्णांत महाराष्ट्रात सर्वाधिक सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारचीदेखील चिंता वाढली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपाहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा केली. कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत इशारा दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER