कोरोना : मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला नाही! माहिती अधिकारात पोलखोल

Maharashtra Today

मुंबई :- कोरोना (Corona) साथीत केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही, अशी ओरड उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) नेहमी करत असते; पण केंद्राकडून मदत मिळावी यासाठी गेल्या सात महिन्यांत उद्धव ठाकरे यांनी पत्रव्यव्हार किंवा पाठपुरावा केला नाही, असे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.

विवेक पांडे (Vivek Pandey) या माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. पांडे म्हणतात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ऑगस्ट २०२० च्या शेवटल्या आठवड्यात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. त्यानंतर एप्रिल २०२१ पर्यंतच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुन्हा पत्रव्यहार नाही! या दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती, हे उल्लेखनीय. मार्च २०२१ ला केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला होता.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पांडे यांनी पत्रात मागण्या केल्या होत्या की –

१) कोरोना प्रतिबंधाबाबत मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या जुलै २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यानच्या पत्रव्यवहारांच्या सॉफ्ट किंवा हार्ड कॉपीज द्या.

२) कोरोनाच्या काळात जुलै २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान, मदत मागण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रांच्या सॉफ्ट किंवा हार्ड कॉपीज द्या.

महाराष्ट्र सरकारने पहिल्या प्रकरणात पांडे यांना पत्राची एकही सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी दिली नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला पत्र लिहिले होते की नाही, हेच कळत नाही!

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button