कोरोना ; विमानांना चीनने प्रवेश नाकारल्याने भारतीयांना परत आणण्यात अडथळा

mental stress to Indians stuck in Wuhan

नवी दिल्ली : ‘करोना व्हायरस’ पीडितांसाठी मदत साहित्य नेण्यासाठी आणि वुहानमधून भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी भारतीय वायुसेनेची विमाने सज्ज आहेत. पण, या विमानांना आपल्या देशात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी चीन टाळाटाळ करत असल्याचा आरोप भारताने केला आहे. करोना व्हायरसनं धुमाकूळ घातलेल्या वुहान शहरात २० फेब्रुवारी रोजी सी – १७ हे लष्कराचं विमान पाठवण्याचा निर्णय भारतानं घेतला होता. परंतु, या विमानाला परवानगी न मिळाल्यानं ते चीनमध्येजाऊ शकले नाही. चीनने म्हटले आहे की, हुबेईमध्ये हा व्हायरस वेगानं पसरत असल्याने सुरक्षा म्हणून देशाबाहेरील विमानांना प्रवेश देण्यात येत नाही.

करोनाचा सामना करण्यासाठी भारतातून चीनमध्ये ग्लोव्ह्ज, सर्जिकल मास्क, फीडिंग पंप आणि डिफिब्रिलेटर अशा वस्तू पाठवण्यात येणार आहेत. फ्रान्ससह इतर देशांच्या विमानांना याच कारणासाठी चीनमधून तत्काळ परवानगी दिली गेली परंतु, ही परवानगी भारतीय विमानांना मात्र अद्याप मिळालेली नाही.

‘चीन सरकार त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या आरोग्य आणि सुरक्षेला महत्त्व देते. आम्ही भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी पूर्ण मदत करत आहोत. परंतु, हुबेईमध्ये व्हायरसचा प्रभाव वाढला आहे. दोन्ही देशांचे विभाग यासंबंधी चर्चा करत आहेत, असे चीनने म्हटले आहे.