…पण बार, पब, नाईट लाईफ- नो लॉकडाऊन! – आशिष शेलार

Ashish Shelar & Uddhav Thackeray.jpg

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू होतो की काय, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) व पुण्यात रात्री संचारबंदीचीदेखील घोषणा केली गेली आहे; शिवाय, मुंबईतील महापौरांनीदेखील लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. यावरून भाजपा (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधाला आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महापौर म्हणतात, लॉकडाऊन पण बार, पब, नाईट लाईफ – नो लॉकडाऊन! महाविकास आघाडी सरकारने ४० हजार लसी वाया घालवल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते अयशस्वी ठरले आहे. साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत. आरोग्यमंत्र्यांना दंड, गुन्हे दाखल, मार्शल लॉ हवा आहे; पण महाविकास आघाडी सरकारने नव्या पेंग्विन कारवान कायद्यावर १०० तास खर्च केलेत, अशा शब्दांमध्ये शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्कात सवलत असतानाही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची मागणी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे आता समोर आले आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाबाबत शाळांकडून दिरंगाईच्या तक्रारी समोर आल्यात. ठाकरे सरकारचे हे कसले धोरण? समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या कंत्राटावर अर्थपूर्ण लक्ष आणि गरीब, मागासवर्गीय मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष!- असे म्हणत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुद्यावरूनदेखील शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER