कोरोनामुळे २६-११ हल्ल्यातील शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावरील सिनेमाचा टीझर रिलीज सोहळा रद्द

major - Maharastra Today

बॉलिवूडमागचे कोरोनाचे संकट काही कमी होताना दिसत नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे बॉलिवूडकरांना सिनेमाशी संबंधित काही कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. २६-११ ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मेजर उन्नीकृष्णन शहीद झाले होते. त्यांच्या जीवनावर ‘मेजर’ सिनेमा तयार करण्यात आला आहे. या सिनेमाचा पहिला टीझर २८ मार्च रोजी एका भव्य सोहोळ्यात आयोजित केला जाणार होता. पण आता कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून हा सोहळा पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळवले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या घरातील कुटुंबियांसोबत अचानक एक घटना घडली आहे. त्यातच कोरोनाचा प्रकोपही वाढू लागला आहे. त्यामुुळे सिनेमाच्या टीझर रिलीजचा २८ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला सोहळा रद्द करण्यात येत आहे. सिनेमाचा टीझर सर्वच प्रमुख भाषांमध्ये रिलीज केला जाणार असून याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या सिनेमात अदिवि शेषने मेजर संदीप उन्नीकृष्ण यांची भूमिका साकारली असून यात शोभिता धुलिपाला, सई मांजरेकर आणि प्रकाश राजही काम करीत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन सशी किरण टिक्का करीत असून याची निर्मिती सोनी पिक्चर फिल्म्स इंडियासोबत जी. एम. बी एंटरटेनमेंट अँड ए प्लस यस मूव्हीज करीत आहे. हा सिनेमा यावर्षी २ जुलै रोजी रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER