राज्यात आज कोरोनाचा ब्लास्ट; २७ हजार १२६ नवीन कोरोनाबाधित, ९२ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ सुरू आहे. याचबरोबर मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २७ हजार १२६ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, ९२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१८ टक्के एवढा झालेला आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

तसेच, आज १३ हजार ५८८ रुग्ण कोरोनातून बरेदेखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.९७ टक्के  एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ७ हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. तसचे, राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER