राज्यात आज कोरोनाचा ब्लास्ट, २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित, ५८ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus

मुंबई :- महाराष्ट्रात चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात करोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस करोना रूग्णसंख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ सुरू आहे. याचबरोबर मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २५ हजार ८३३ नवीन करोनाबाधित वाढले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२२ टक्के एवढा झालेला आहे. आतापर्यंत राज्यात ५३ हजार १३८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

तसेच, आज १२,१७४ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २१,७५,५६५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९०.७९ % एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७९,५६,८३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,९६,३४० (१३.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,१३,२११ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तर ७ हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. तसचे, राज्यात आज रोजी एकूण १,६६,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER