मुंबईत कोरोनाचा विस्फोट; आज १० हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळले

Mumbai - Coronavirus

मुंबई :- राज्यात वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट अजूनही सुरूच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल १० हजार ३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना स्थिती अतिशय विदारक बनत असल्याचं चित्र या आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.

मुंबईत (Mumbai) आज कोरोना रुग्णांच्या संख्येनं १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर ७ हजार १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या ७७ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आज दिवसभरात ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये २० पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७९ टक्के झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button