युएस ओपनमध्ये कोरोनामुळे गोंधळात गोंधळ, एकास न्याय, दुसऱ्यावर अन्याय

Kristina Mladenovic

कोरोनाच्या (Corona) साथीतही बायो बबलमध्ये !(Bio Bubble) न्यूयॉर्क येथे खेळल्या जात असलेल्या युएस ओपन टेनिस (US Open Tennis) स्पर्धेच्या आयोजकांनी एक विचित्र निर्णय घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या (Contact tracing) मुद्द्यावरुन त्यांनी महिला दुहेरीतील अग्रमानांकित जोडी क्रिस्टिना मेलेडेनोव्हिक (फ्रान्स) (Kristina Mladenovic) व हंगेरीच्या टिमिया बाबोस (Timea Babos) जोडीला खेळू देण्यास मनाई केली मात्र त्याचवेळी कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या फ्रान्सच्याच एद्रियन मेनोरिनो याला मात्र एकेरीचा सामना खेळण्यास परवानगी दिली. मेलेडेनोव्हिक व मेनोरिनो हे दोघेही कोरोनाची बाधा झालेल्या फ्रेंच खेळाडू बेनोईट पेयरेच्या संपर्कात आले होते. मात्र एकाच प्रकरणात एकाला एक न्याय व दुसऱ्यावर अन्याय हा टेनिस जगतात चर्चेचा विषय झाला आहे. नियम सर्वांना सारखेच असायला हवेत अशी भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नासौ काऊंटीच्या क्वारंटीन नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना बाधित व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिलेल्य व्यक्तींना नासौ काउंटी प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार युएस टेनिस असोसिएशनने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

पेयरे हा बायो बबलमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना ,पॉझिटिव्ह आढळला. या काळात बरेच खेळाडू त्याच्या संपर्कात आले होते. नासौ काऊंटीतील दोन हॉटेलात खेळाडूंची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठीकाणी टाईमपास करताना काही खेळाडू पेयरेसोबत पत्ते आदी खेळ खेळताना दिसले होते. त्या खेळाडूंच्या हालचालींबाबत व भेटीगाठींबद्दलचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले होते पण त्यांना खेळायची परवानगी देण्यात आली होती.अशा खेळाडूंमध्ये मेलेडेनोव्हिक व मेनोरिनो होतो.

महिला एकेरीत मेलेडेनोव्हिक दुसऱ्या फेरीत आणि मेनोरिनो पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभूत झाला. मेनोरिनोचा तिसऱ्या फेरीचा सामना अलेक्सान्देर झ्वेरेवविरुध्द होता. त्यात मेनोरिनोला खेळू द्यावे की नाही यावर नासौ काऊंटीचे अधिकारी व आयोजकांदरम्यान आरोग्य सुरक्षेच्या मुद्द्यावर दीर्घकाळ खल चालला. त्यामुळे सामना तब्बल तीन तास उशिराने सुरू झाला. आयोजकांच्या सुदैवाने त्यात खेळायची परवानगी देण्यात आलेला मेनोरिनो पराभूत झाला. तो जिंकला असता तर आयोजकांच्या अडचणीत वाढ झाली असती.

एकीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये येऊनही मेनोरिनोला खेळण्यास परवानगी दिली गेली पण क्रिस्टिना मेलेडेनोव्हिक हिला मात्र स्पर्धा सोडून देण्यास सांगण्यात आले. क्रिस्टिनाने कोरोनासंदर्भात सर्व बंधने पाळण्याची तयारी दर्शवली होती. क्रिस्टिना, मेनोरिनोशिवाय एदुआर्द रॉजर व्हसेलीन हासुध्दा पेयरेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र सुरुवातीला या खेळाडूंना माघार घेण्याऐवजी नव्या अटी व शर्थींचे कडक निर्बंधासह पालन करण्याचे सांगण्यात आले. त्यात त्यांना दररोज कोरोना चाचणीचे बंधन घालण्यात आले होते. त्यांना खेळव्यतिरिक्तच्या वेळेत हॉटेलातील आपल्या रुममध्येच थांबण्यास सांगितले होते. त्यांना कुणालाही भेटण्यास मनाई होती. मैदानावर लार रुम व जेवणाच्या ठिकाणी त्यांना प्रवेश नव्हता. व्यायामशाळेतही त्यांना परवानगीनेच स्वातंत्र जागेत प्रवेश होता. ही बंधन त्रासदायक असली तरी क्रिस्टिना त्यांचे पालन करायला तयार होती. ती दोनदा चाचणीत निगेटिव्हसुध्दा आली होती. पैयरेला भेटलो तेंव्हा आपण मास्कसुध्दा लावलेले होते असे ती म्हणते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER