कोरोना : राज्यात सर्व सुरु करण्याचा निर्णय विचार करुनच : छगन भुजबळ

नाशिक :- राज्यात नवरात्रौत्सवादरम्यान सर्व उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीदरम्यान नियम लागू राहतील. सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. सर्वांनी सहकार्य करावे. कावडीवाल्यांनी देखील गडावर येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. दिलासा देतांना ते म्हणाले की – राज्यात हळूहळू सगळ खूल करायचे आहे. पण सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

नाशिकमध्ये (Nashik) अॅक्टिव्ह रुगणांची संख्या ७६१ ने कमी झाली आहे. सध्या सहा हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहे. रुग्णालयातला औषधांचा साठा रोज तपासला जातो आहे. ऑक्सिजनची आपली क्षमता ५० मेट्रिक टन आहे. त्यापेक्षा दुप्पट साठा आपल्याकडे आहे. उद्यापासून दोन हजार सिलेंडर रोज मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. तसेच उद्योग कारखान्यांना ऑक्सिजन देण्याचीही व्यवस्था करणे सुरु आहे. तसेच कारखाने बंद राहणार नाहीत याची काळजी घेऊ, असे भुजबळ म्हणालेत.

नाशिकमध्ये मृत्यू दर १. ७० टक्के आहे. कोरोनाचे (Corona) रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८० टक्क्यांपर्यंत आली आहे. बाहेर फिरताना मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. मास्क न वापरणाऱ्यांशी दुकानदारांनी व्यवहार करू नये,” अशी सूचनाही भुजबळांनी दिली.

नाशिकमध्ये परमिट रुम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत परमिट रुम सुरू राहणार आहेत. इतर रेस्टॉरंट सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत सुरु राहतील. इतर व्यावसायिकांनी रात्री ८ वाजता दुकान बंद करावी, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER