कोरोना : राज्यात आज आढळलेत नवे ३,५५८ रुग्ण, मृत्यूचा एकूण आकडा ५०,०६१

Coronavirus

मुंबई : राज्यात आज ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळलेत. ३४ चा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झालेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात आज आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे रुग्णांची एकूण संख्या १९,६९,११४ झाली आहे. एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या ३४ मृतांच्या संख्येमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ५४,१७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात आढळले २६४

दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे आज दिवस अखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आजअखेर १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER