कोरोना : लोकल प्रवासासंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता

Local Train

नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’ (Mini Lockdown)चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने निर्बंध कडक करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आज संध्याकाळी महत्वाची बैठक बोलावली असून यावेळी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकल बंद होणार का हा प्रश्न मुंबईकरांना सतावत असून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी यासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी नागपुरात बोलत होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुंबई लोकल बंद होणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, लोकलसंदर्भात मागील वर्षी आपण निर्णय घेतला होता. आपण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामध्ये मग आरोग्य विभाग, रेस्तराँ, कर्मचारी, चाकरमानी यांचा समावेश होता. जी मागील वेळी उपाययोजना केली होती यावेळीही तशीच करणार आहोत. यावेळी त्यांनी मुंबई लोकल बंद होणार नाही. लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं जाईल. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल,” असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, करोना संक्रमणाचा वाढत असलेला वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक जर योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील, असं महापौर म्हणाल्या.

मुंबईत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुंबईत मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावले जाऊ शकतात. तसेच दुकाने आणि बाजरपेठा एक दिवस आड सुरू करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय मुंबईतील लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चसारखीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. नव्या निर्बंधासंदर्भात आज सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button