कोरोना : आज आढळलेत ८,७४४ नवे रुग्ण, बरे झालेत ९,०६८

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यातील करोनाचे (Coronavirus) रुग्ण अजूनही मोठ्या संख्येत वाढत आहेत. गेल्या २४ तासात नवे ८,७४४ रुग्ण आदळलेत. गेल्या काही दिवसांपासून रोज आठ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत होते. ही संख्या काल तर ११ हजारांच्या वर गेली होती. बरे होणाऱ्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त राहत होती. थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ९ हजार ६८ रुग्ण बरे झाले आहेत.

आज २२ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात एकूण ९७,६३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,७७,११२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.२१ व मृत्यूदर २.३६ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६९,३८,२२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,२८,४७१ (१३.१६ टक्के ) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४१,७०२ व्यक्ती गृहविलगीकरणात आणि ४,०९८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER