कोरोना : राज्यात आढळलेत ८,३३३ नवे रुग्ण, ४८ चा मृत्यू

Rajesh Tope Coronavirus

मुंबई : राज्यात करोनाचे (Corona) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढतो आहे. राज्यात आज ८,३३३ नवे रुग्ण आढळलेत. ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात रुग्णांचा मृत्यू दर २.४३ टक्के आहे. दरम्यान, आज ४,९३६ रुग्ण बरे झाले आहेत.

रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६१,१२,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,३८,१५४ (१३.२७ टक्के) पॉझिटिव्ह आढळलेत. सध्या राज्यात ३,१८,७०७ व्यक्ती गृहविलगीकरणात तर २ हजार ६८८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागतील अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत, या मुद्द्यांच्या आधारावर राज्यात यापुढील काळात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. करोनाची लस आली असली तरी वाढत्या प्रसाराला आवर घालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER