कोरोना : राज्यात आज आढळलेत नवे ८,२९३ रुग्ण, ६२ चा मृत्यू

Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग वेगाने वाढताना दिसतो आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्य ८ हजारापेक्षा जास्त आहे. रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही ५० च्या वरच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यत ८,२९३ रुग्ण वाढले असुन, ६२ चा मृत्यू झाला. दरम्यान, ३,७५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या रुग्णांची संख्या २१ लाख ५५ हजार ७० वर पोहचली आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यू दर २.४२ टक्के व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.९५ टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७७,००८ आहे. आजपर्यंत ५२ हजार १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,६२,८४,६१२ नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७० (१३.२३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळलेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ जण गृहविलगीकरणात आणि ३ हजार ३३२ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER