कोरोना : राज्यात आज वाढले ७,८६३ रुग्ण, ५४ चा मृत्यू

Rajesh Tope

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ७,८६३ रुग्णांची वाढ झाली. ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ६,३३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८९ टक्के आहे. मृत्यूदर २.४१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आहेत.

सध्या राज्यात ३,५५,७८४ व्यक्ती गृहविलगीकरणात तर ३,५५८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सध्या राज्यात ७९,०९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER