कोरोना : महाराष्ट्रात आज ७६२० रुग्ण झाले बरे; ५४,५७३ वर उपचार सुरू

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात ७ हजार ६२० कोरोना (Corona) रुग्ण बरे झालेत. राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख १ हजार ७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५१ टक्के झाले  आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये ९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ४८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५४ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER