कोरोना : राज्यात आज ६७७६ रुग्णांना मिळाली सुटी, नवे ५२२९

Corona Virus

मुंबई : महाराष्ट्रात आज ६७७६ रुग्णांना सुटी देण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ५० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) राज्यात ९२.८१ टक्के झाला आहे. आज राज्यात ५ हजार २२९ नवे आढळले आहेत. मागील २४ तासात १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यू दर २.५८ टक्के आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ नमुने पॉझिटिव्ह आढळले. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ संशयित रुग्ण होम क्वारंटाइन तर ५ हजार ५६७ संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ आहे. आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू मागील ४८ तासांमधील आहेत. तर २७ मृत्यू हे मागील आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER