कोरोना : राज्यात आढळलेत नवे ५५४४ रुग्ण, ८५ चा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई : गेल्या चोवीस तासांत राज्यात नवे ५ हजार ५४४ नव्या रुग्ण आढळले आहेत. ८५ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारच्या तुलनेत राज्यातील करोनाबाधितांच्या (Corona) संख्येत थोडी घसरण झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येचा आलेख खाली आला होता त्यात वाढ होते आहे.

राज्यातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता १८ लाख २० हजार ०५९ वर पोहोचली आहे. १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ९० हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एकूण ४७ ०७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०० रुग्णांची नोंद झाली असून १४२ बरे झाले आहेत. उपचारादरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १५९ वर पोहचली असून त्यातील ८८१७९ बरे झालेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER