कोरोना : राज्यात आज आढळलेत ५३६९ नवे रुग्ण; ३ हजारापेक्षा जास्त झाले बरे

Corona Virus

मुंबई : राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे ५ हजार ३६९ नवे रुग्ण आढळले. ३ हजार ७२६ रुग्ण बरे झालेत. गेल्या २४ तासात ११३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ वर पोहचली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.९२ टक्क्यांवर पोहचले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

गेल्या काही दिवसात राज्यात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी असायची पण, आज नव्या रुग्णांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. राज्यातील करोनाची साथ कमी होण्याची चिन्ह दिसत असली तरी रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत रोज भर पडतच आहे. नागरिकांनी मास्कच्या वापरासह करोना संसर्ग रोखण्यासाठी अन्य सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

राज्यातील एकूण १६ लाख ८३ हजार ७७५ रुग्णांमध्ये १ लाख २५ हजार १०९ अॅक्टिव्ह केसेस, सुटी मिळालेले १५ लाख १४ हजार ७९ आहेत. सध्या राज्यात रुग्णांचा मृत्यू दर २.६१ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख २४ हजार ८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ८३ हजार ७७५ (१८.६६ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ४४ हजार ७९९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १२ हजार २३० संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER