कोरोना : राज्यात बरे झालेत ५२,८९८ रुग्ण; रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर!

Maharashtra Coronavirus

मुंबई : १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या रुग्णांचा आकडा कमी होतो आहे. राज्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नवे रुग्ण आढळलेत व ५२ हजार ८९८ रुग्ण बरे झालेत. बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा राज्यात आता ४९ लाख २७ हजार ४८० झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहे!

मात्र, रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना मृत्युदर मात्र कमी होत नाही. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांच्या एकूण मृत्यूचा आकडा ८३ हजार ७७७ झाला आहे. मृत्युदर १.५४ टक्के आहे.

पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के
आज राज्यात सापडलेल्या नव्या २८ हजार ४३८ रुग्णांमुळे राज्यात रुग्णांचा एकूण आकडा आता ५४ लाख ३३ हजार ५०६ इतका झाला आहे. त्यापैकी ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ कोरोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ झाला आहे.

पुण्यात १ हजार २१ नवे रुग्ण
पुण्यात २४ तासांत १ हजार २१ नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ६१ हजार ८ झाली आहे. दिवसभरात पुण्यात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा मृत्यूचा आकडा ७ हजार ७९५ झाला आहे. २ हजार ८९२ रुग्णांना सुटी देण्यात आली असून आजपर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button