कोरोना ५० लाख रुग्ण : ११ दिवसात तब्बल १० लाख

Coronavirus Cases India

नवी दिल्ली : भारतातील कोरोना (Corona) बाधीतची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना रूग्णांची संख्या ५० लाखांवर गेली. मागील फक्त ११ दिवसात तब्बल १० लाख लोक बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८० हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

देशात कोरोना रूग्ण वाढीवर नजर टाकल्यास गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात १ ते १० लाख प्रकरणे होण्यास १६७ दिवस लागले होते. १० ते २० लाख प्रकरणे केवळ २१ दिवसांत, २० ते ३० लाख प्रकरणे १६ दिवसात ३० ते ४० लाख प्रकरणे १३ दिवसात, तर ४० ते ५० लाख प्रकरणे ११ दिवसांत झाली आहेत. कोरोना प्रकरणात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका प्रथम आणि ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोना महामारीने देश हादरवून टाकला आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्ण येत आहेत. दिल्ली, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये या आजाराने बाधित लोकांची संख्या दररोज वाढत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER