कोरोना : राज्यात आज आढळले ४४९६ नवे रुग्ण

Rajesh Tope Coronavirus

मुंबई : आज राज्यात ४४९६ नवे रुग्ण आढळले. मागील २४ तासांत  ७८०९ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९२.४४ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत १६ लाख ५ हजार ६४ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत १२२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा मृत्युदर २.६३ टक्के इतका आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख ६४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात ८,११,०३५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज राज्यात ८४,६२७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

आज राज्यात ४४९६ नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ३६ हजार ३२९ झाली आहे. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूंपैकी ८५ मागील ४८ तासांमधील आहेत. तर ३७ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER