कोरोना : आज आढळलेत नवे ४३८२ रुग्ण

Coronavirus-Maharashtra

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३८२ नवीन रुग्ण आढळलेत. २५७० रुग्ण बरे झालेत. ६६ चा मृत्यू झाला. बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत आज नवीन रुग्णांचा आकडा जास्त असल्याने चिंतेत काहीशी भर पडली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९४. ७९ आहे तर मृत्यूदर २.५५ टक्के आहे.

नवीन करोनाचे (Corona) राज्यात आठ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तीन इतर राज्यांतील असल्याचे स्पष्ट झाल्याने व हे आठही रुग्ण लक्षणे विरहित ( Asymptomatic ) असल्याने तूर्त मोठा धोका नसला तरी आधीचा करोना संसर्ग अजूनही डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात या आजाराने ४९ हजार ८२५ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ५२ हजार ७५९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली. असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३१ लाख ३४ हजार १९ इतक्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ५४ हजार ५५३ (१४.८८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३३ हजार ८७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ५२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER