कोरोना : राज्यात आढळलेत ४२५९ नवे रुग्ण, ८० चा मृत्यू

Coronavirus

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४२५९ नवे रुग्ण आढळलेत व ८० रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ३९४९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ७६ हजार ६९९ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.४६ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

राज्यात सध्या ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह केसेस असून, १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४८ हजार १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९ (१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइन व ४ हजार ५०० संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

ब्रिटननंतर अमेरिकेतही फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेक कोरोनावरची लस विकसित करत आहेत. या लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी मिळाली आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे व २ लाख ९२ हजार रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER