कोरोना : राज्यात आढळले नवे ३९५९ रुग्ण; बरे झालेत ६४७८

Corona Updates

मुंबई :- महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे (Corona) ३९५९ नवे रुग्ण आढळले व ६४७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ९० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.५३ आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

राज्यात आज १५०रुग्णांच्या मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांचा मृत्यूदर २.६३ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ७८ हजार ५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १४ हजार २७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात सध्या १० लाख ७१ हजार १६३ व्यक्ती होम तर ९ हजार ७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ९९१५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख १४ हजार २७३ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या १५० मृत्यूंपैकी ७० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ४७ मृत्यू मागील आठवड्यातले आहे. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत असे विश्लेषण आरोग्य विभागाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER