कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत ३६९३ नवे रुग्ण, ७३ चा मृत्यू

Corona Updates

मुंबई :- राज्यातील कोरोनाचा (Corona) संसर्ग अजूनही वाढतोच आहे. शुक्रवारी (८ जानेवारी) दिवसभरात ३६३९ नवे रुग्ण आढळलेत. २८९० रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण १८ लाख ५८ हजार ९९९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७५ टक्के झाले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता १९ लाख ६१ हजार ९७५ वर पोहचली आहे. सध्या राज्यात ५१८३८ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. सर्वाधिक अ‌ॅक्टिव्हरुग्ण पुणे जिल्ह्यात १३७१८ आहेत. पुण्यानंतर ठाण्यात १०३५३तर मुंबईत ७९२७ आणि नागपूरमध्ये ५०६३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज ७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजपर्यंत एकूण ४९९७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्णांच्या मृत्यूचा दर २. ५५ आहे. सर्वाधिक मृत्यू मुंबईमध्ये १११७३ झाले आहेत. पुणे जिल्ह्यात ७८१८ आणि ठाण्यात ५६२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३२ लाख ६७ हजार ९१७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी १९ लाख ६१ हजार ९७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १४. ७९ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५८५ होम तर ३०१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER