कोरोना : राज्यात आज आढळलेत ३, ६७० नवे रुग्ण

Rajesh Tope Corona

मुंबई :- राज्यात आज परत एकदा दिवसभरात बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. आज दिवसभरात ३, ६७० नवे रुग्ण आढळले असून, २, ४२२ बरे झालेत. राज्यात आजपर्यंत १९ लाख ७२ हजार ४७५ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात एकूण ३१ हजार ४७४ अॅक्टिव्ह रुग्ण असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१ टक्के झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वटिद्वारे ही माहिती दिली.

राज्यात गेले काही दिवस करोना रुग्णसंख्या घटली होती. त्यामुळे बंधने शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु या आठवडय़ात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. काळजी घेणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER