कोरोना : राज्यात आज आढळलेत नवे ३,६११ रुग्ण, ३८ चा मृत्यू

Corona Virus

मुंबई : राज्यात आज (शनिवारी) मागील २४ तासात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या बरे झालेल्यांपेक्षा जात आहे. आज राज्यभरात ३, ६११ नवे रुग्ण आदळलेत व १, ७७३ बरे झालेत. ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या २० लाख ६० हजार १८६ वर पोहचली आहे.

राज्यात आतापर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९५.८३ टक्के आहे. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३३ हजार २६९ असून, आजपर्यंत ५१ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

राज्यात उतरणीला लागलेला रुग्णसंख्येचा आलेख या आठवडय़ात पुन्हा वर गेला. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्य़ात आठवडाभरात पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER