कोरोना : राज्यात आज आढळलेत ३५८० नवे रुग्ण, ८९ चा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई :- राज्यातील कोरोनाचा (Corona) संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडते आहे. आज दिवसभरात राज्यात ३५८० नवे रुग्ण आढळलेत, ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ३१७१ रुग्ण बरे झालेत.

राज्यातील करोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता १९ लाख ९ हजार ९५१ झाली आहे. सध्या राज्यात ५४ हजार ८९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ४ हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER