कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत ३३१४ नवे रुग्ण, ६६ चा मृत्यू

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात आज नवे ३३१४ रुग्ण आढळलेत. ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी दिवसभरात २१२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या १९ लाख १९ हजार ५५० वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.२९ टक्के आहे.

सध्या राज्यात ५९ हजार २१४ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,२,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १९ हजार ५५० (१५.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन तर ३ हजार ३२३ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER