कोरोना : आज बरे झालेत ३२८२ रुग्ण, रिकव्हरी रेट ९४.७७ टक्के

Coronavirus

मुंबई : राज्यातील करोना (Corona) संसर्ग अद्याप थांबला जरी नसला तरी, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. आज ३२८२ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत एकूण १८ लाख ७१ हजार २७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.७ टक्के आहे.

आज दिवसभरात २९३६ नवे रुग्ण आढळलेत. ५० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ७४ हजार ४८८ वर पोहचली आहे. सध्या राज्यात ५१ हजार ८९२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. एकूण ५० हजार १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १,३५,००, ७३४ नमून्यांपैकी १९ लाख ७४ हजार ४८८ (१४.६३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख २७ हजार ८७६ जण गृह तर २ हजार ३८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

राज्यात करोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज ‘सिरम इन्स्टिट्यूट’कडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस मिळालेत. त्याचे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय वाटप होणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER