कोरोना : राज्यात दिवसभरात आढळलेत नवे ३१६० रुग्ण, ६४ चा मृत्यू

Corona Virus

मुंबई :- आज दिवसभरात राज्यात ३१६० नवे रुग्ण आढळलेत. ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत २८२८ रुग्ण बरे झालेत. राज्यातील आता करोनाच्या रुग्णांची संख्या १९ लाख ५० हजार १७१ वर पोहचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९४.८७ टक्के आहे.

सध्या राज्यात ४९ हजार ६७ अ‌ॅक्टिव्ह केसेस असून, आजपर्यंत १८ लाख ५० हजार १८९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे (Corona) राज्यात आजपर्यंत ४९ हजार ७५९ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १,३०,६१,९७६ नमुन्यांपैकी आजपर्यंत १९ लाख ५० हजार १७१(१४.९३ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ५५७ संशयित गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ७८८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकारपरिषदेत सांगितले आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER